जामसूत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जामसूत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वै. सद्गुरु ह.भ.प. लेले महाराज याच्या कृपेने श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ व संत जनाबाई महिला मंडळ (जांभुर्णेवाडी) जामसूत यांच्या वतीने हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव १ ते ३ एप्रिल या कालावधीत साजरा केला जाणार आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ वा. अभिषेक वीणापूजन व वै. गुरुवर्य ह.भ.प. लेले महाराज यांचा समाधी सोहळा व श्री राम जप, सकाळी ९ वा. जांभुर्णेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या सहयोगातून स्वखर्चातून बांधलेल्या नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत रक्तदान शिबिर, सायं. ७ ते ९ वा. ह.भ.प. बापू महाराज नाडे (पाटण) यांचे हरिकीर्तन, रात्री १० नंतर संगीत भजन.
२ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वा. हनुमान जन्मकाळ, सकाळी ७ ते १० वा. पादुका पालखी मिरवणूक, सकाळी १० वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी २ वा. संत जनाबाई महिला मंडळ जांभुर्णेवाडी हळदी-कुंकू समारंभ, सायं. ७ ते ९ वेळेत ह.भ.प. मुक्ताताई नारायण महाराज पवार (अनारी) यांचे हरिकीर्तन, रात्री. १०.३० नंतर जांभुर्णेवाडीचा बहारदार कार्यक्रम. ३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० वा. ह.भ.प. गणेश महाराज शिगवण (खेड) यांचे काल्याचे कीर्तन, सकाळी १० ते १२ वा. श्री सत्यनारायण महापूजा विसर्जन व कार्यक्रम समारोप, दुपारी १२ नंतर काल्याचा महाप्रसाद होईल.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यवस्थापक, श्री संत गोरोबाकाका नेवा मंडळ व संत जनावाई महिला मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी यांनी केले आहे.

