मुख्य बातमी

खेड-दापोली रस्त्याच्या कामासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याबाबत अधिसूचना

रत्नागिरी : कार्यकारी अभियंता, सावर्जनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांनी खेड-दापोली रस्ता (राज्य महामार्ग १६२) सुधारण्याचे काम ‘हॅम’ (HAM) योजनेअंतर्गत प्रगतीपथावर आहे. या कामाच्या अनुषंगाने साखळी क्रमांक ०/३०० येथे स्लॅब ड्रेन/पुलाच्या पुनर्रचनेचे काम प्रस्तावित आहे. हे काम सुरक्षितपणे व विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असल्याने अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, यांनी मोटार वाहन कायदा १९७८ चे कलम ११५ प्रमाणे आदेश दिले आहेत.

दापोली-खेड वाहतूक वळविणे (दोन्ही बाजूने) : साखळी क्रमांक ०/३०० येथील पुलाच्या कामासाठी सध्याची १२ मीटर उपलब्ध रुंदी अपुरी असल्याने, ३ महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे:

सध्याचा मार्ग : दापोली- खेड (थेट राज्य मार्ग क्र. १६२).

प्रस्तावित वळण मार्ग :-दापोली-खेड- पिसई- पालगड फाटा राज्य मार्ग क्र. १०१ खेड (दोन्ही दिशेने).

प्रवासाचे अंतर : सध्याचे अंतर साधारण ३० किमी असून, वळण मार्गानुसार साधारण ३८ किमी राहील. (अतिरिक्त अंतर अंदाजे ८ किमी)

बॉक्साईट वाहनांची अवजड वाहतूक वळविणे : मंडणगड तालुक्यातील बॉक्साईट खाणीतून येणारी अवजड वाहने सध्या राज्य मार्ग क्र. १०१ आणि राज्य मार्ग क्र. १६२ वरून दस्तुरी फाटा ते भरणा नाका मार्गे खेड शहरातून जातात. खेड शहरातील लांबीत विषयांकित काम सुरू असल्याने बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या मोठ्या प्रमाणातील अवजड वाहनांमुळे खेड शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बॉक्साईट वाहने खालीलप्रमाणे वळविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

सध्याचा मार्ग : बॉक्साईट खाण मंडणगड राज्य मार्ग क्र. १०१ दस्तुरी फाटा- खेड शहर भरणा नाका.

प्रस्तावित वळण मार्ग : बॉक्साईट खाण मंडणगड ते विसापूर फाटा (नेहमीप्रमाणे) – पुढे राज्य मार्ग क्र. ९७ (लाटवण – रेवतळे फाटा) राज्य मार्ग क्र. १७२ (नातुनगर तुळशी विन्हेरे भोगाव) आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (मुंबई-गोवा) वरून ‘भरणा नाका.

प्रवासाचे अंतर : सध्याचे अंतर साधारण ५० किमी (खाण ते भरणा नाका) असून, प्रस्तावित वळण मार्ग हा साधारण ७० किमी अंतराचा राहील. (अतिरिक्त अंतर अंदाजे २० किमी)

सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सवलतधारकामार्फत वळण मार्गावर आवश्यक ते सर्व दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करारनाम्यातील अटींनुसार करण्यात येणार आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरील प्रमाणे वाहतूक वळविण्यात येत आहे. यासाठी योग्य नियोजन करण्याच्या तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेला माहिती मिळण्याच्यादृष्टीने योग्य वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी, असे आदेशित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!