श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे सावर्डे वहाळ फाटा येथे आज रक्तदान शिबिर

आबलोली (संदेश कदम) : श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष गजानन गणपत लोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (११ एप्रिल) दुपारी १ वाजेपर्यंत सावर्डे (ता. चिपळूण) येथील श्री देवांग कोष्टी समाज भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी या मंडळाचे सचिव अरविंद भंडारी यांनी केले आहे.
दरम्यान, या उपक्रमासाठी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण रुग्णालय यांचे सहकार्य लाभणार असून समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाची जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे.
या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करून रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


