मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

सामाजिक वनीकरण विभागाच्या चित्रकला स्पर्धेत आर्या जानवळकर व समृद्धी आंबेकर प्रथम

पाटपन्हाळे विद्यालयातील शैक्षणिक उपक्रम

आबलोली (संदेश कदम) : निसर्गाबाबत जनजागृती होणे व वृक्ष संवर्धन करणे या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवी व इयत्ता नववी ते दहावी या दोन गटांत नुकतीच चित्रकला स्पर्धा झाली. यात पहिल्या गटात आर्या अनंत जानवळकर, तर दुसऱ्या गटात समृद्धी सुरेश आंबेकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.

या चित्रकला स्पर्धेसाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीला विरोध करणारी मुले असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गट क्रमांक १ मध्ये आर्या अनंत जानवळकर व गट क्रमांक २ मध्ये समृद्धी सुरेश आंबेकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. सुयशस्वी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. दबडे, श्री. माळी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

चित्रकला स्पर्धेत पाचवी ते आठवी या प्राथमिक गटात आर्या अनंत जानवळकर, ओजस्वी सुधीर वासनिक, नेहा संदीप निवाते यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. तर नववी ते दहावी या माध्यमिक गटात समृद्धी सुरेश आंबेकर, श्रीया संतोष नागेश, मैथिली विनोद कदम यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.

या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चित्रकला स्पर्धेतील सुयशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक एस. बी. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. सुयशस्वी व सहभागी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. दबडे, श्री. माळी, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!