गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला बुद्धिबळ संघाला विभागीय सुवर्णपदक; पुरुष संघास रौप्य पदक प्राप्त

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग – क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) महिला संघाने सुवर्णपदक आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर सलग पाचव्या वर्षी अजिंक्यपद प्राप्त केले. व गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष संघाने रौप्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धा कोंकण विभाग व एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने एमआयडीसी येथे संयुक्तरित्या आयोजित केल्या होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सुवर्णपदक प्राप्त महिला बुद्धिबळ विजयी संघात हिमानी फाटक (एमए भाग २), अस्मिता खानविलकर (तृतीय वर्ष बीएसस्सी बायोकेमिस्ट्री), निर्मिती सुर्वे (प्रथम वर्षबी एसस्सी मायक्रो), गौरवी गावडे (द्वितीय वर्ष बायोटेक्नॉलॉजी), तेजश्री डोलकर (द्वितीय वर्ष बीएसस्सी आयटी), अस्मिया साटविलकर (प्रथम वर्ष बीएसस्सी) या खेळाडू सहभागी झाल्या होत्या.
रौप्य पदकप्राप्त पुरुष बुध्दिबळ संघात कौस्तुभ हर्डीकर (द्वितीय वर्ष बीएसस्सी), यश तरळ (एमकॉम भाग २), श्रेयस दाते (एम कॉम भाग २), हर्ष सुर्वे (एमकॉम भाग १), श्रवण बांदेकर (प्रथम वर्ष बीएसस्सी मायक्रो), अद्वैत काळे (प्रथम वर्ष बीबीए) हे खेळाडू सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, विवेक सोहनी यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, महेश खैरे यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही संघांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, प्राध्यापक, कर्मचारी, सेवकांनी केले.



