मुख्य बातमी
हनुमान जयंतीनिमित्त वरवडे येथे कीर्तन

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे भंडारवाडा येथील मयेकर परिवार व ग्रामस्थांतर्फे श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. रत्नागिरीतील प्रसन्नराज जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले आहे. उद्या (दि. २ एप्रिल) पहाटे ५ वा. जन्मोत्सवाचे, तर रात्री ८ वा. लळीताचे कीर्तन होणार आहे.
कीर्तनकार प्रसन्नराज जोशी यांना प्रसाद वैद्य तबला, तर संतोष गोडबोले संवादिनी साथ करणार आहेत. यावेळी दर्शनाचा व किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मयेकर पवार व ग्रामस्थांनी केले आहे.



