मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना

संगमेश्वर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त आज (१४ मे) जिल्ह्यात प्रथमच संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पोलीस बँड पथकासह संभाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना देण्याची ही ऐतिहासिक व अभिमानास्पद घटना असून, यामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना सादर करत संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!