भाजपकडून राजापुरात मानवी मनोऱ्यांचा थरार; दहीहंडी उत्सवाचे आयोजन
नृत्यांगना जान्हवी व ‘ढोलकीच्या तालावर’ फेम निशा जाधव यांच्या नृत्य कार्यक्रमाचे खास आकर्षण

राजापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजापूरच्या वतीने आज (६ सप्टेंबर) भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या उत्सवामध्ये मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला मिळणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विधानपरिषद सदस्य तथा माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न समितीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महादेवराव गोठणकर, प्रदेश महिला मोर्चा सचिव ऐश्वर्या जठार, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भाजप लांजा मंडल अध्यक्ष विराज हरमले, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हनकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण शिवलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सहदेव बेतकर, भाजप जिल्हाध्यक्षा शितल पटेल, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा ठेकणे, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, लांजा मंडल अध्यक्ष शैलेश खामकर आदींची उपस्थिती लाभणार आहे.
दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना जान्हवी तसेच ‘कलर्स मराठी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या निशा जाधव यांच्या बहारदार नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दहीहंडीच्या थरारासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी राजापूरकरांना अनुभवता येणार आहे.
या उत्सवाला राजापूर पंचायत समितीचे उपसभापती तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव, भाजपचे शहराध्यक्ष सुशांत मराठे , राजापूर (पश्चिम) मंडल अध्यक्ष मोहन घुमे, राजापूर (पूर्व) मंडल अध्यक्ष एकनाथ मोडे, महिला शहराध्यक्ष सौ. स्नेहा रहाटे हे निमंत्रक असून, भाजपा राजापूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राजापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



