मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हासामाजिक

कांटे शाळेला श्री जांगलदेव नवतरुण मित्रमंडळाकडून वायरलेस प्रिंटर भेट

लांजा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक कांटे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी ‘श्री.जांगलदेव नवतरुण मित्रमंडळ, मुंबई’ यांच्या वतीने सुमारे १६,५०० रुपये किंमतीचा कॅनन जी३०१० या आधुनिक वायरलेस प्रिंटरची भेट देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामांना आता अधिक वेग मिळणार आहे.

मुंबईस्थित असलेल्या श्री जांगलदेव नवतरुण मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलले आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने हा वायरलेस प्रिंटर शाळेला प्रदान करण्यात आला.

या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ. प्रार्थना सचिन देसाई, सहकारी शिक्षक पंकज कुशिनाथ खडांगळे, विद्यार्थी तसेच या मंडळाचे अध्यक्ष मारुती नारायण आग्रे, प्रशांत कुळये, प्रकाश कुळये, वसंत कुळये, सुनील आग्रे, सिद्धेश कुळये, महेश गोरुले, संदेश कुळये, सुरेश वालम (बापेरे) मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. मंडळाच्या या दातृत्वाबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “या प्रिंटरमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका, शैक्षणिक साहित्य आणि इतर कार्यालयीन कागदपत्रे काढणे सोपे होणार असून, तंत्रज्ञानाचा वापर शाळेत वाढण्यास मदत होईल,” अशा भावना मुख्याध्यापिका सौ. देसाई यावेळी व्यक्त झाल्या.

श्री जांगलदेव नवतरुण मित्रमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी अशाच प्रकारचे सहकार्य लाभेल, अशी आशा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!