मुख्य बातमीशैक्षणिक

बीडीएस परीक्षेत ल. ग. पटवर्धन हायस्कूलचे यश

रत्नागिरी : गोरेज् फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यामार्फत जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेचा निकाल २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून, या परीक्षेमध्ये शहरातील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी २ गोल्ड मेडल्स, १० सिल्व्हर मेडल्स, २० ब्राँझ मेडल्स पटकावून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

गोल्ड मेडलप्राप्त विद्यार्थी असे : पूजा बाबुराव पास्ते (इ. २ री), स्वरा अभिजीत मांडवकर (इ. २ री). सिल्व्हर मेडल्स प्राप्त विद्यार्थी : सार्थक शैलेश देसाई (इ. १ ली), उन्नती विश्वास सुर्वे (इ. १ ली), श्रवण महेंद्र लोखंडे (इ.१ ली), समृद्धी सुशील सावंत (इ. १ ली), सर्वज्ञा संदीप तांबे (इ. २ री), रजत गौरेश जोगळेकर (इ.२ री), श्रेयांशु समीर पावसकर (इ. २ री), पारस विलास मुंडेकर (इ. ३री), उर्वी प्रतीक कळंबटे (इ. ३ री), आर्या विशाल मोरे (इ. ४ थी). ब्राँझ मेडल्स प्राप्त विद्यार्थी : पार्थ्वी श्रीराम देवळेकर (इ. १ ली), गार्गी सागर घडशी (इ. १ ली), स्वानंद कमलेश सुर्वे (इ. १ ली), मानस साईप्रसाद मोरे (इ. १ ली), शिवम योगेश उत्तेकर (इ. १ ली), स्वरा योगेश लिंगायत (इ.१ ली), दर्शना लीलाधर कुंभार (इ. १ ली), अन्विता योगेश चिकोडीकर (इ. १ ली), सृष्टी निलेश कोलगे (इ. २ री), आरोही अमितकुमार सोलकर (इ.२ री), हर्ष संतोष लोटलीकर (इ. २ री), शिवतेज सुनील धावडे (इ. २ री), विराज रितेश धायगुडे (इ. ३ री), हर्ष प्रसाद राऊत (इ. ३ री), ओवी प्रथमेश आंबेकर (इ. ३री), स्वरा गणेश पाटील (इ. ३ री), ऋत्वी प्रसाद शिर्के (इ. ३ री), विराज स्वप्नील सावंत (इ. ३ री), नियती विपिन सावंत (इ. ४ थी), वैष्णवी शैलेश प्रभूदेसाई (इ. ४ थी).

या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे, छोटीराम सूर्यवंशी, सौ. श्रेया मांडवकर, सौ. दुर्वा भोरे, अमित वेदरे, सौ. स्वप्नजा मांडवकर, हणमंत ऐवळे, सौ. मुग्धा नेने, मनोज घाणेकर, प्रवीण मोरे, सौ. नेहा राजेशिर्के, श्रीम. गायत्री औघडे या शिक्षकांचे तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे, श्रीमती महाडिक, मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!