क्रीडामुख्य बातमी

कराडमध्ये रत्नागिरीचा डंका; महेश मिलके स्विमिंग ग्रुप ठरला ओव्हरऑल चॅम्पियन

५३ पदकांसह ५ वैयक्तिक चॅम्पियनशिप

रत्नागिरी : उंब्रज (कराड) येथे ३१ मे रोजी जिजामाता स्विमिंग पूल व हेल्थ क्लब यांच्या वतीने विभागीय निमंत्रित जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या २५ खेळाडूंनी विविध वयोगटांत भाग घेत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. ग्रुपने ३५४ गुणांसह ‘ओव्हरऑल चॅम्पियन ट्रॉफी’ जिंकून एकतर्फी ऐतिहासिक विजय साजरा केला.

या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘स्पेशल चाईल्ड’ प्रवर्गात रत्नागिरीच्या दोन जिद्दी खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर प्रत्येकी २ रौप्य पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशाने संपूर्ण रत्नागिरीकरांची मान अभिमानाने उंचवली आहे. त्रिशा भुजबलराव आणि श्रीपाद मयेकर यांनी प्रत्येकी दोन २ रौप्यपदकांसह ५ खेळाडूंनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली. यामध्ये नाझीफा मंगा (मास्टर्स गट) ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप, तनया मिलके (ओपन गट) ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप, आयुष काळे (१७ वर्षांखालील) १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदकासह (विभागून) वैयक्तिक चॅम्पियनशिप, निधी भिडे (१५ वर्षांखालील) ३ सुवर्ण, १ रौप्य पदकासह वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि अधिश जाधव (७ वर्षांखालील) ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप या खेळाडूंचा समावेश आहे.

खेळाडूंची चमकदार पदक कामगिरी:

मास्टर्स व ओपन गट – विशाल कुबल (मास्टर्स) ३ रौप्य, १ कांस्य पदक, बीना तेंडुलकर (मास्टर्स) १ रौप्य, १ कांस्य पदक, अल्फाराज कापडे (ओपन) ३ रौप्य पदक, संस्कृती जाधव (ओपन): ३ रौप्य, १ कांस्य पदक.

वयोगट खेळाडू – योगेंद्र तावडे (१७ वर्षांखालील) २ सुवर्ण, १ कांस्य पदक, आरोही पिलणकर (१७ वर्षांखालील) १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदक, आयुष कताळे (१५ वर्षांखालील) ३ रौप्य, १ कांस्य पदक, अर्णव पिलणकर (१३ वर्षांखालील) १ कांस्य पदक, रिद्धेश हरचेकर (९ वर्षांखालील) १ कांस्य पदक, आराध्या शिंदे (७ वर्षांखालील) २ रौप्य पदक.

ओपन गटाच्या अटीतटीच्या रिले (Relay) स्पर्धेतही मिलके ग्रुपच्या दोन्ही संघांनी वर्चस्व राखले. सुवर्ण पदक (ग्रुप A) – संस्कृती जाधव, तनया मिलके, योगेंद्र तावडे, आयुष काळे. रौप्य पदक (ग्रुप B) : श्रावणी सावंत, नाझीफा मंगा, हर्शल सावंत, आयुष कताळे.

१७ वर्षाखालील मुले रिले- सुवर्ण पदक : हर्शल सावंत, आयुष कताळे, आयुष काळे, योगेंद्र तावडे.

या स्पर्धेत इझान कापडे व साईशा भोपळे या दोन्ही अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्या खेळाडूंनी ७ वर्षांखालील गटात धाडसाने सहभाग घेतला. त्यांनी २५ मीटर व ५० मीटर अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करत संपूर्ण क्रीडा संकुलाचे आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

रत्नागिरी जिल्ह्याचे व ग्रुपचे मुख्य प्रशिक्षक, राष्ट्रीय जलतरणपटू आणि ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक २०२५’ पुरस्कार विजेते श्री. महेश मिलके सर यांना या स्पर्धेत ‘उत्कृष्ट मार्गदर्शक’ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आदर करत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची ‘मुख्य पंच’ म्हणून निवड करण्यात आली होती, जी रत्नागिरीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे आणि मुख्य मार्गदर्शक महेश मिलके सरांचे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातून आणि सर्व स्तरांतून जोरदार कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!