मुख्य बातमी

रत्नागिरी एमआयडीसी येथील वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त 

रत्नागिरी : एमआयडीसी येथील वैश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (१९५६) एका नेपाळी महिलेला पोलिसांनी अटक केली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन महिलांची या व्यवसायातून सुटका केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी, रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक (डमी) पाठवून प्लॉट ई-६८, मिरजोळे एमआयडीसी येथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान, एका नेपाळी महिलेकडून पुण्यातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या पथकात सपोनि. श्रीमती शबनम मुजावर, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहेकॉ. विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, मपोहेकॉ. स्वाती राणे, शीतल कांबळे, मपोकॉ पाटील आणि पोना दत्ता कांबळे यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!