Uncategorized
अधिक मासानिमित्त काजरघाटीतील श्री महालक्ष्मी मंदिरात कुंकुमार्चन पूजा

रत्नागिरी : अधिक महिन्यानिमित्त काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामस्थ, महिला भगिनींनी सामूहिक कुंकुमार्चन पूजा व आरती, मंत्रपुष्पांजली करून श्री चरणी सेवा अर्पण केली. वेदमूर्ती पाध्ये गुरुजी व रवी पंडित गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

यानिमित्ताने समस्त ग्रामस्थ महिला मंडळाच्या सहकार्याने देवस्थानासाठी २ नग गॅसच्या मोठ्या शेगड्या श्री चरणी भेट म्हणून अर्पण केल्या. या वेळी देवस्थान खजिनदार प्रकाश जाधव, पुजारी महेंद्र लिंगायत, बाळू गोताड, दिलीप पटवर्धन, प्रमोद भडकमकर, ओंकार भडकमकर, स्वप्नील प्रभू, किशोर पिलणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. देवस्थान कमिटीने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.


