रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्हेंट हायस्कूलमध्ये (शहर) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये (रत्नागिरी शहर) २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तीत साजरा करण्यात आला. निरोगी आरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व पटवून देणारा हा विशेष कार्यक्रम सकाळी ८ वाजता सुरू झाला.
क्रीडा शिक्षक समीर निकम व क्रीडा शिक्षिका शीतल वाडेकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना ताडासन, वज्रासन, भुजंगासन, आणि प्राणायाम यांसारख्या विविध आसनांची सविस्तर माहिती दिली आणि त्यांची प्रात्यक्षिके करून घेतली.
या उपक्रमात शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांनी विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात योगासने करण्याचे आवाहन केले. तसेच नियमित योगाभ्यासाने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती कशी राखता येते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.



