मुख्य बातमी

नवनिर्माण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकवृंद त्याच बरोबर शिक्षकेत्तर कर्मचार्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या वेळी यांनी विद्यार्थ्यांना योग तज्ज्ञ योग मार्गदर्शक रुतुजा वाझे यांनी योगाचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय योग दिनाची पार्श्वभूमी तसेच भारतीय योग परंपरेची गौरवशाली परंपरा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य कसे सुदृढ राहते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. आणि योगप्रकार शिकवले व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्याचबरोबर यावेळी योग मार्गदर्शक शुभांगी सोळंकी यांनी प्राणायाम आणि प्राणायामाचे महत्त्व सांगितले यावेळी कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी अशा काही प्राणायामाची माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी केले व आभार प्रा. सुकुमार शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!