मुख्य बातमी

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार

रत्नागिरी : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये (रत्नागिरी शहर) दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित केला होता.

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या (एसएससी) परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १३० विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन, ४५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर १ विद्यार्थ्याने पास श्रेणी मिळवली आहे. या यशात सृष्टी होतेकर, मिहीर काणेकर आणि हर्ष जांगले यांनी पहिल्या तीन क्रमांकांसह विशेष चमक दाखवली. या परीक्षेत यश संपादन केलेल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण एस.एस.सी. बॅचचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांना शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या निकालातून मोठे यश लाभले आहे, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सिस्टर आफ्रा, सिस्टर कविता तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!