मुख्य बातमीशैक्षणिक

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी दुर्गेश जाधव याची निवड

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थी सचिव पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा दुर्गेश जाधव हा निवडून आला. द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची गौरवी ओळकर हिची विद्यार्थी उपसचिव म्हणून निवड झाली.

महाविद्यालयातर्फे प्र.प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. वैभव घाणेकर तसेच निवडणूक साक्षरता मंचाचे प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!