मुख्य बातमी
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

रत्नागिरी : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती आज (२६ जून) सकाळी १२ वाजता साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी एल. व्ही. पवार, शिवराम विठ्ठल कदम, दीपक जाधव, केतन पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



