मुख्य बातमी

पूर्णगड केंद्रातर्फे शिक्षिका संजया पावसकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वीमधील शिक्षिका श्रीमती संजया संजय पावसकर यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबद्दल केंद्रीय प्रमुख संजय राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

मेर्वी शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्राचे प्रमुख श्री. राणे, केंद्र मुख्याध्यापिका भारती तायशेट्ये, विशेष शिक्षिका सौ. तृप्ती शिरगावकर, कुर्धे शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ नवाथे, गणेशगुळे शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा सावंत, मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आणि पूर्णगड केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीताने केली. मान्यवरांचे स्वागत विषय शिक्षिका सौ. करगुटकर यांनी केले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह राजेंद्र रांगणकर, संतोष मुंडे, नारायण झगडे, उपशिक्षिका शहनाज भाटकर तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांनी सत्कारमूर्ती श्रीमती संजया पावसकर यांच्या कार्याचा गौरव करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक श्री. भाटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!