मुख्य बातमी

रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती; ७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या स्वच्छतेसाठी आणि बागकामासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ‘सफाईगार’ व ‘माळी’ ही पदे कंत्राटी करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या कामासाठी इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांकडून मोहोरबंद निविदा अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक कंत्राटदारांनी कोऱ्या निविदेचा अर्ज संस्थेच्या कार्यालयातून ३० जून ते ७ जुलै या कालावधीत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) मिळवून घ्यायचा आहे. या कोऱ्या निविदा अर्जाची किंमत ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

निविदा अर्जातील सर्व माहिती पूर्ण भरून, तो मोहोरबंद लिफाफ्यात दि. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शासकीय तंत्रनिकेतनाचे प्राचार्य यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या सर्व निविदा ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उपस्थित कंत्राटदारांच्या समक्ष उघडण्यात येतील.

या कंत्राटी भरती प्रक्रियेबाबतचे सविस्तर नियम व अटी निविदा अर्जासोबत देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तंत्रनिकेतन प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!