मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी 

खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी ६ वाजण्याचा सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री सामंत यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!