आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

“इनरव्हील क्लब”तर्फे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा

यशस्वी कोळंबी शेतकरी श्रद्धा अनगोळकर यांचा सत्कार

रत्नागिरी : राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे (१० जुलै) औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे पटवर्धन हायस्कूल येथे “मत्स्य शेतीतील रोजगार संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. यात शिबिरात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. सुशील कांबळे यांनी “मत्स्य शेतीतील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर, तर प्रतीक यादव यांनी “कोळंबी संवर्धनातील रोजगाराच्या संधी” याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील यशस्वी कोळंबी संवर्धक आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविकाधारक श्रद्धा अनगोळकर-कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्रद्धा अनगोळकर यांनी राजापूर, दापोली तालुक्यात कोळंबी शेती फार्म तयार केले असून, त्या यशस्वीपणे कोळंबी शेती करत आहेत. त्यांनी स्वरोजगार निर्माण केला असून इतरांना सुद्धा रोजगाराची संधी निर्माण केली आहे. वर्षातून दोन वेळेला निर्यातक्षम कोळंबीचे पीक घेतले जाते.

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नैसर्गिक जल स्त्रोतातील मत्स्य साठा प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी यामुळे हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे मत्स्य शेती करून मत्स्य उत्पादन वाढविणे शक्य आहे. मत्स्य व्यवसायामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारातून संधी उपलब्ध असून तरुण/विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन त्यात स्वतःचे करिअर करू शकतात. शासनातर्फे विविध योजना उपलब्ध असून त्याचा फायदा घ्यावा.

यावेळी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा ऋचा गांधी, श्रद्धा सावंत, डाॅ. प्रियांका कांबळे, आशा सनगर, अपूर्वा सुर्वे, अनुश्री सावंत उपस्थित होत्या . पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!