मुख्य बातमी

शिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा परिषद 'आदर्श शिक्षक' आणि 'आदर्श शाळा' पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२५ व २०२५-२६) चा दिमाखदार वितरण सोहळा आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याला भारतरत्न पा. वा. काणे आणि सानेगुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे. सानेगुरुजींच्या आईने दिलेला ‘ह्रदयाला आणि मनाला मळ लागणार नाही’ हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना प्रत्यक्ष राबवला पाहिजे. शिक्षकांनी संघर्षापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातही ‘दामले विद्यालया’सारख्या दर्जेदार शाळा निर्माण व्हाव्यात आणि पुढील वर्षी जिल्ह्यातील किमान ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतील, हे उद्दिष्ट शिक्षकांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावे.

‘शिव्यामुक्त’ आणि ‘नशामुक्त’ शाळेचे आवाहन

अस्मिता केंद्रे (अध्यक्ष, जि.प.): शासकीय कामकाजासोबतच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याचे शिक्षकांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या विशेषतः पदोन्नती देण्यापासून मी कामकाजाला सुरुवात केली.

वैदेही रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी): जिल्ह्यातील १००% शाळा ‘निपुण शाळा’ घोषित करण्याचे आपले ध्येय आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि त्यांच्यात चांगल्या वर्तनाची सवय लावण्यासाठी आता ‘शिव्यामुक्त शाळा’ आणि ‘नशामुक्त शाळा’ हे मिशन हाती घेण्याची गरज आहे. तसेच, पटसंख्येअभावी एकही शाळा बंद पडणार नाही, याची काळजी शिक्षकांनी घ्यावी.

उपाध्यक्ष श्री. चाळके व शिक्षण सभापती श्री. मुरकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२०२५ : मंडणगड : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ. शाळा बाणकोट किल्ला उर्दू, वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा पालघर. दापोली : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ. मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी, वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा शिरसोली नं.१. खेड : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ.शाळा आंबवली, जि.प.पूर्ण प्राथ. शाळा भोस्ते नं.१. चिपळूण : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ. शाळा कुशिवडे शिगवणवाडी. वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मांडकी खुर्द. गुहागर : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ.शाळा पाचेरीसडा नं.३. वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा वेलदूर घरटवाडी नं.१. संगमेश्वर : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प. प्राथ. शाळा माभळे घडशीवाडी. वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ.शाळा हातीव नं. रत्नागिरी : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ. शाळा शिवार आंबेरे नं. २. वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ.शाळा भोके आंबेकरवाडी. लांजा : कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ.शाळा चाफेट नेमण, वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ. केंद्र शाळा कुवे नं.२. राजापूर :

कनिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.प्राथ. शाळा मोसम नं. २. वरिष्ठ प्राथमिक शाळा- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा कशेळी नं.५.

जिल्हा परिषद रत्नागिरी, शिक्षण विभाग (प्राथमिक).

आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२५ : मंडणगड- संजय बाबाजी करावडे (पदवीधर शिक्षक, जि.प. पू. प्राथ. मराठी शाळा बामणघर), दापोली- जावेद मैनोद्दीन शेख (उपशिक्षक, जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाकवली नं. १), खेड- एकनाथ आनंदराव पाटील (पदवीधर शिक्षक, जि.प.पूर्ण प्राथ.शाळा सवेणी नं. १), चिपळूण- नरेश सदाशिव मोरे (पदवीधर शिक्षक, पाग मुलांची, चिपळूण), गुहागर- चंद्रकांत राजाराम बेलेकर (उपशिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा जानवळे नं.१), संगमेश्वर- विनय विलास होडे (पदवीधर शिक्षक, जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा हातीव नं. १), रत्नागिरी- प्रदीप शांताराम जाधव (पदवीधर शिक्षक, जि. प. पू. प्राथ. आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी), लांजा- नितीन हरिश्चंद्र शेंडगे (उपशिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वाकेड नं. १), राजापूर- सुहास यशवंत काडगे (पदवीधर शिक्षक, जि. प.पू. प्रा. गोखले कन्याशाळा राजापूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!