मुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन 

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर क्राईम, व्यसनाधीनता, मुलांवर होणारे अत्याचार, वाहनांविषयी असलेले शासकीय नियम, त्याचप्रमाणे गुड टच बॅड टच यांविषयी माहिती देण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांमार्फत विविध शाळांमध्ये जाऊन सायबर क्राईम, व्यसनाधीनता, मुलांवर होणारे अत्याचार, वाहनांविषयी असलेले शासकीय नियम, त्याचप्रमाणे गुड टच बॅड टच यांविषयी जागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोतवडे हायस्कूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक जितेन्द्र पालांडे, हवालदार गणपत झोरे, पोलीस काॅस्टेबल अनुजा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध प्रकारच्या धोक्यांविषयी माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांचा असलेला वयोगट, समाजाची ढासळलेली व्यवस्था, भौतिक सुखाकडे वाढणारा कल, या सगळ्यांचा तरुण पिढीवर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सुरेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन जागृती निर्माण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!