मुख्य बातमी
जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी येथे माजी उपमुख्यमंत्री अजि पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका भारती तायशेट्ये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, शालेय मुख्यमंत्री सोहम खर्डे, उपमुख्यमंत्री पूर्वी फडके आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. भाटकर, विषय शिक्षिका श्रीमती करगुटकर, उपशिक्षिका श्रीमती तायशेट्ये, उपशिक्षक श्री. पेटकर आदी शिक्षकांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून कथन केली.


