शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुका यांच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बसणी आणि पावसमध्ये सामाजिक उपक्रम

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आज रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांच्या हस्ते जी. एम. शेट्ये हायस्कूल (बसणी) आणि मराठी शाळा (पावस) येथे उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये उपतालुकाप्रमुख विजय देसाई, सुभाष पावसकर,पावस विभागप्रमुख किरण तोडणकर, शिरगाव उपविभागप्रमुख अमित धांगडे, बसणी शाखाप्रमुख महेश नेवरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक दादा धांगडे आणि काळबादेवी शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे व संतोष नेवरेकर उपस्थित होते.
महिला आघाडीच्या वतीने महिला जिल्हा संघटक सौ. सायली पवार, उपतालुका संघटक सौ. समिधा भाटकर, शहर संघटक सौ. सेजल बोराटे, सौ. मेधा कोल्हटकर, महिला विभाग संघटक सौ. सरिता चव्हाण आणि विभाग संघटक सौ. आस्था धांगडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी दोन्ही शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



