माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खेड आणि चिपळूण येथे ऑगस्ट महिन्यात कल्याण संघटकांचे दौरे

रत्नागिरी : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी ऑगस्ट २०२६ मध्ये खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दौऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे : ३ ऑगस्ट (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे उपस्थित राहतील. ४ ऑगस्ट (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे दौऱ्यावर असतील. १० ऑगस्ट (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक राहुल काटे उपस्थित राहतील. ११ ऑगस्ट (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे दौऱ्यावर असतील. १७ ऑगस्ट (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे अ. शा. कल्याण संघटक सुनिल कदम उपस्थित राहतील. १८ ऑगस्ट (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे अ. शा. कल्याण संघटक सुनिल कदम दौऱ्यावर असतील. २४ ऑगस्ट (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे उपस्थित राहतील. २५ ऑगस्ट (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे दौऱ्यावर असतील.
या दौऱ्यांदरम्यान माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणारे अभिलेख कार्यालय विषयक (Record Office) प्रश्न, पेन्शन विषयक अडचणी, महासैनिक पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन (नोंदणी) करणे तसेच इतर सर्व प्रकारच्या प्रशासकीय अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मेळाव्यात येताना महासैनिक पोर्टलवर (www.mahsainik.maharashtra.gov.in) नोंदणी केलेली पावती, डिस्चार्ज बुक (Discharge Book), पीपीओ (PPO) ची प्रत, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड, आधार कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल फोन ही कागदपत्रे मूळ प्रतीसह (Originals) आणि छायांकित प्रतींसह (Xerox) सोबत आणावीत.
जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या केंद्रावर ठरवून दिलेल्या तारखेला उपस्थित राहून या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


