मुख्य बातमी

मालगुंड आरोग्य केंद्राच्या वतीने गणपतीपुळे येथे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड व श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाले. या वेळी १११ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबाराम माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व मंदिर ट्रस्टचे सक्रिय कार्यकर्ते राज देवरुखकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर, राजेंद्र रणसे, सीएचओ मनाली तारवे, श्रीमती ठाकरे, एएनएम अश्विनी गोवळकर, श्रीमती कदम, लॅब टेक्निशियन श्रुतिका मोहित, आरोग्य सेवक श्री. जाधव, श्री. कासेकर, समता फाउंडेशनचे नितेश शेट्ये, नेत्र चिकित्सक मैथिली मेहतर, मदतनीस सांची गवाणकर, आशा सेविका गावणकर, तसेच सीआरपी गुरव यांनी सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.

या शिबिरामध्ये संपूर्ण वैद्यकीय तपासणी, ईसीजी, रक्त तपासणी, वजन व उंची मोजणी, नेत्र तपासणी तसेच आरोग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट यांनी सर्व उपस्थित मान्यवर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व लाभार्थी नागरिकांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!