“मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेल समिती सदस्यांची संयुक्त बैठक संपन्न

रत्नागिरी : पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” उपक्रमांतर्गत येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सुरक्षा समितीवरील अशासकीय सदस्य तसेच भरोसा सेल समितीवरील सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी उपस्थित सदस्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान उपस्थित सदस्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचून जनजागृती व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.



