डेरवण येथे रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा उत्साहात
२५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग : प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू करणार राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आदित्य गजमल, अनुष्का राणीम, अथर्व पवार, आर्या भुवड, वेदांत वाघे, चिन्मयी शिगवण यांनी ट्रायथलॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील गटात आदित्य गजमल आणि वेदिका जगदाळे वेगवान धावपटू ठरले. प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू २७ ते ३० ऑगस्टदरम्यान एसव्हीजेसीटी क्रीडा अकॅडमी, डेरवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
एसव्हीजेसीटी क्रीडा अकॅडमी, डेरवण येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित जिल्हा स्पर्धेत २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदक विजेत्या व राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक अविनाश पवार, सैफन चरके, सुहास चव्हाण, संतोष शिर्के यांनी अभिनंदन केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकाल :१४ वर्षांखालील मुले व मुली ट्रायथलॉन ए – यश शिगवण (खेड), हर्षित सार्दळ (लांजा), आर्यन गुरव (चिपळूण). अनुष्का राणीम (चिपळूण), संस्कृती घुमे (संगमेश्वर), वीणा शिंदे (संगमेश्वर) ट्रायथलॉन बी – अथर्व पवार (रत्नागिरी), सार्थक सुतार (चिपळूण), प्रणव यादव (चिपळूण). आर्या भुवड (चिपळूण), दुर्गा गुरव (राजापूर), श्रुती पळसमकर (राजापूर). ट्रायथलॉन सी – वेदांत वाघे (गुहागर), क्षितिज जुवळे (रत्नागिरी), स्वराज यादव (चिपळूण), चिन्मयी शिगवण (गुहागर), सौम्या सरफरे (रत्नागिरी), शुभरा सरफरे (रत्नागिरी).
१६ वर्षांखालील मुले – ६० मीटर धावणे : आदित्य गजमल (खेड), पवन शिगवण (गुहागर), नैतिक कदम (रत्नागिरी). ६०० मीटर धावणे – वेदांत पाटील (चिपळूण), सार्थक कुळये (लांजा), पवन शिगवण (गुहागर). ८० मीटर हर्डल्स – देवेंद्र लिंबुकर (संगमेश्वर), रोमित जाधव (संगमेश्वर), सौरभ माटल (लांजा). लांब उडी – सार्थक कुळये (लांजा), नैतिक कदम (रत्नागिरी). उंच उडी – सूरज भैरे (दापोली), अथर्व पातेरे (संगमेश्वर). गोळा फेक – शुभम आखाडे (रत्नागिरी), नूरआलम अन्सारी (रत्नागिरी), संकल्प गुरव (राजापूर). थाळीफेक – नूर आलम अन्सारी (रत्नागिरी), नुमान चरके (रत्नागिरी). भालाफेक साज जाधव (संगमेश्वर), धनराज शिंदे (रत्नागिरी), आराध्य कदम (चिपळूण). पेंटर आदित्य पातेरे (संगमेश्वर), सार्थक धामणे (संगमेश्वर).
१६ वर्षांखालील मुली – ६० मीटर धावणे – वेदिका जगदाळे (संगमेश्वर), तन्वी पवार (चिपळूण), ६०० मीटर धावणे – स्वरा उपशेटे (लांजा), पायल खाके (संगमेश्वर), प्राप्ती तरळ (राजापूर). ८० मीटर हर्डल्स – अस्मिता पळसमकर (राजापूर), पायल खाके (संगमेश्वर), इच्छा भिंगे (चिपळूण). लांब उडी – वेदिका जगदाळे (संगमेश्वर), श्रेया मरकड (रत्नागिरी), कार्तिकी कांबळे (रत्नागिरी). उंच उडी – सानवी चव्हाण (लांजा), निधी शिगवण (चिपळूण). गोळा फेक – अपूर्वा गमरे (चिपळूण), दानिया जुवाले (संगमेश्वर), हस्ता कदम (चिपळूण). थाळीफेक आस्था नवाले (रत्नागिरी). भालाफेक – मरियम वाडकर (रत्नागिरी), आसावी मोरे (खेड), शमिका पवार (चिपळूण).
१८ वर्षांखालील मुले – १०० मीटर धावणे तन्मेश कटनाक (रत्नागिरी), रुद्र वाडेकर (रत्नागिरी), सनी बदड. २०० मीटर धावणे – सनी बदड (संगमेश्वर), पृथ्वीराज ढोबल. ४०० मीटर धावणे – कार्तिक पावस्कर (रत्नागिरी), मनीष पालये (लांजा), विपुल साळवी (चिपळूण). १००० धावणे – आयुष बर्जे (चिपळूण), पृथ्वी राजभर (चिपळूण), सुनील रेवाळे (दापोली). ५ किमी. चालणे – आदित्य जाधव (चिपळूण), वंश पावस्कर (रत्नागिरी). लांब उडी – आदित्य पाटील (रत्नागिरी), तन्मय घाणेकर (रत्नागिरी), आदर्श माईंगडे. उंच उडी – साईराज आंब्रे (संगमेश्वर), शुभम ढेबे (खेड), ओमकार शिंदे (संगमेश्वर), गोळा फेक – साईराज आंब्रे (संगमेश्वर), निनाद महाबळे (रत्नागिरी). थाळीफेक – अरहान झांबारकर (संगमेश्वर), निनाद महाबळे (रत्नागिरी), हर्षवर्धन मदने (चिपळूण). भालाफेक – अरहान जांभारकर (संगमेश्वर), ऋतुराज लांजेकर (गुहागर), हर्षवर्धन मदने (चिपळूण).
१८ वर्षांखालील मुली – १०० मीटर धावणे – अनुष्का दोरकडे (संगमेश्वर), प्रीती पंडित (चिपळूण), मनस्वी कांबळे (रत्नागिरी). २०० मीटर धावणे – आर्या पवार (दापोली), वैदही गुरव (दापोली), वैष्णवी गुरव (रत्नागिरी). ४०० मीटर धावणे – वैदही गुरव (दापोली), रिया आग्रे (लांजा). १००० मीटर धावणे सिमरन पवार (संगमेश्वर), साक्षी मांडवकर (राजापूर). ५ किमी. चालणे – श्रुती जोशी (चिपळूण), कल्याणी तरळ (राजापूर). लांब उडी – तनुजा घाणेकर (रत्नागिरी), सिमरन पवार (संगमेश्वर), शिवानी मिरजोळकर (राजापूर). गोळा फेक – श्रवणी खाके (संगमेश्वर), फातिमा चरके (रत्नागिरी), संजीवनी जाधव (संगमेश्वर), थाळीफेक – शिवानी जाधव (संगमेश्वर), श्रेया पातेरे (संगमेश्वर). भालाफेक – श्रेया पातेरे (संगमेश्वर), फातिमा चरके (रत्नागिरी), श्रावणी खाके (संगमेश्वर).
२० वर्षांखालील – मुले १०० मीटर धावणे – वंश तांबे (खेड), ऋतिक कदम (लांजा), पवन शिगवण (चिपळूण), २०० मीटर धावणे – वंश तांबे (खेड), यशराज हळवनकर (चिपळूण), अनुराग सरवंडे (लांजा). ४०० मीटर धावणे – यश सकपाळ (लांजा), ओमकार जाधव (रत्नागिरी), प्रणव पावरी (रत्नागिरी), ८०० मीटर धावणे – चेतन खामकर (संगमेश्वर), हिमांशू लांबट (रत्नागिरी). १५०० मीटर धावणे – सूरज निवडेकर (लांजा), अर्जुन पराडे (दापोली). ५००० मीटर धावणे – राज धुळप (संगमेश्वर), यश पवार (खेड), अर्जुन पराडे (दापोली). ११० मीटर हर्डल्स – यज्ञेश सावंत देसाई (चिपळूण), ५ किमी. चालणे सरफराज शेख (खेड). लांब उडी- यशराज हलनावर (चिपळूण), समर्थ जंगम (खेड), राजमाने (रत्नागिरी). उंच उडी – आर्यन खेराडे (चिपळूण), गोळा फेक – पारस दिवाडकर (गुहागर), निखिल भोसले (खेड), श्रेयश प्रभुदेसाई (खेड). थाळीफेक – श्रेयस साळवी (राजापूर), श्रेयस प्रभूदेसाई (खेड). भालाफेक – व्यंकटेश इंदुलकर (संगमेश्वर), संदीप चव्हाण (खेड), पारस दिवाडकर (गुहागर), हातोडा फेक – सुरज नेवडेकर (लांजा).
२० वर्षांखालील मुली २०० मीटर धावणे – सिद्धी मोरे (चिपळूण), १५०० मीटर धावणे – प्रियांका जोगळे (राजापूर), देवयानी राठोड (राजापूर), सुविधा पानगले (रत्नागिरी). ३००० मीटर धावणे – ज्ञानेश्वरी भारती (लांजा), पूजा गुरव (लांजा), ५००० मीटर धावणे – ध्रुविका माजलकर (लांजा). लांब उडी – वैष्णवी तांबे (रत्नागिरी), श्रुती झिंबर (गुहागर), तिहेरी उडी – मंजिरी गावडे (लांजा), गोळा फेक – सानिका विचारे (लांजा), सिद्धी मोरे (खेड). थाळीफेक तन्वी खाडे (खेड).



