सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय भवन कुवारबाव रत्नागिरी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनटक्के यांनी भूषविले. या कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव यांनी आणि त्यांचे सहकारी दशरथ कांबळे यांनी सायबर क्राईम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तसेच बँक खात्यामधून होणारी पैशांची चोरी या विषयांवर मान्यवरांनी उपस्थितांना अनभिज्ञ गोष्टी विषद केल्या, यावेळी उपस्थित्तांत आपल्या बाबतीत असेही होऊ शकते? अशा प्रतिक्रिया उमटल्या.
या कार्यक्रमाला रत्नागिरीमधील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या उपस्थित होते. श्री. जाधव आणि श्री. कांबळे यांनी सायबर क्राईम या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कृतज्ञता आणि समाधान व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस पवार यांनी केले.



