मुख्य बातमी
रत्नदुर्ग किल्ल्यावर ४ ऑक्टोबरला स्वच्छता व संवर्धन मोहीम

रत्नागिरी : गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी विभाग आणि राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रत्नदुर्ग येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
ही मोहीम रविवारी (४ ऑक्टोबर) रोजी सकाळी ८ वाजता किल्ले रत्नदुर्ग येथे होणार आहे. किल्ल्याची स्वच्छता, संवर्धन तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नागरिक, शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७६६६७ ०८२०१ / ९९२०९ ०५९२०



