मुख्य बातमी
सुहास भोळे यांच्या अन्वेषण नाटकाला लेखन पुरस्कार

रत्नागिरी : सन १९७६ पासून विविधांगी लेखन करणाऱ्या रत्नागिरीतील हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे यांच्या ३८ व्या नाटकाला नुकताच पुरस्कार मिळाला आहे. मुंबईतील कामाक्षी क्रिएटिव्ह आणि मराठी साहित्य व कला सेवा आयोजित जागतिक स्तरावरील नाट्यलेखन स्पर्धेत १२८ संहितातून लेखक सुहास भोळे, रत्नागिरी यांच्या ‘अन्वेषण’ या नाट्यसंहितेसाठी विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रमोद पवार आणि प्रदीप कबरे यांच्या हस्ते ट्रॉफी शाल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी मा. रमेश भिडे , मा. नारायण जाधव आणि मा. विजय टाकळे यांनी या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण केले होते.



