मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
दहा वर्षांच्या मुलीचे धाडस; आईला मगरीच्या तावडीतून सोडवले

चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी पवार (३५) यांच्यावर मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला असता, सोबत असलेल्या दहा वर्षांच्या मुलगी स्वर्णी हिने धाडसाने आईचा हात पकडून तिला बाहेर खेचले.
या घटनेत नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
पावसाळ्यात वाशिष्ठी नदीत मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी नदीत पोहणे, कपडे अथवा जनावरे धुण्यासाठी जाणे टाळावे, तसेच लहान मुलांना नदीकाठी नेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.



