मुख्य बातमी

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे पडले महागात

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल 

रत्नागिरी : स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (१२ सप्टेंबर) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

हर्षराज पाटील त्‍याच्या विरोधात पोलीस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित हर्षराज पाटीलने २२ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे पाटीलवाडी येथील सार्वजनिक रस्त्‍यावर तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत फिर्यादी पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांना माहिती मिळाली होती. त्‍यांना व्हॉटसॲप या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. यावरून संशयिताने मानवी जिवितास किंवा इतरांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणून दहशत माजवण्याच्या हेतूने स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून, रत्‍नागिरीचे अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. याबाबत त्‍याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५, भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) चा भंग कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!