मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा आमदार म्हणून मी कटिबद्ध : आमदार किरण सामंत

राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डोंगर जेटीचे उद्घाटन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या जेटीमुळे परिसरातील मच्छीमारांना मासेमारीसाठी ये-जा करण्याबरोबरच नौका सुरक्षितपणे उभ्या करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

साखरीनाटे परिसरातील मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, जेटीशी संबंधित प्रश्न तसेच मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित होता. डोंगर जेटीची सुविधा उपलब्ध झाल्याने या परिसरातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “मच्छीमार बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे. तुमचा आमदार म्हणून मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”

कोकणातील मच्छीमार हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. जेटीबरोबरच संरक्षक भिंती, रस्ते, वीज, पाणी आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार सामंत यांनी सांगितले.

मच्छीमार बांधवांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहून त्यांच्या अडचणींच्या वेळी मदतीसाठी पुढे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

डोंगर जेटी सुरू झाल्यामुळे साखरीनाटे परिसरातील मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळणार आहे. जेटीसाठी पाठपुरावा करून ती सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मच्छीमार बांधवांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले.

या उद्घाटन कार्यक्रमास सभापती नंदिनी कदम, रवींद्र नागरेकर, आशपाक हाजू, दीपक नागले, अमजद बोरकर, शफी वाडकर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अजगर बांगी, अल्ताफ बोरकर, सुलतान मोहळकर, मनोज आडवीळकर, विनोद शेलार, आतिफ हातवळकर, हसन हुसेन, आदिल मस्कर यांच्यासह मच्छीमार बांधव, महिला, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!