मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गणपती बाप्पाच्या आगमनाने खोडदे गाव झाले भक्तिमय

आबलोली (संदेश कदम) : गणपती बाप्पाच्या आगमनानंतर भक्तांच्या आनंदाला उधाण आले असून बाप्पाच्या आरतीमधे आणि नाच-गाण्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तल्लीन झाले आहेत.

गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील झरेवाडी येथे उद्योजक गजानन साळवी, सचिन साळवी, संदेश साळवी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाचे धुमधडाक्यात जंगी स्वागत करण्यात आले. बाप्पाच्या सेवेसाठी चिंद्रावळे (ता. गुहागर) गावातील मायभूमी कलामंच चिंद्रावळे डाफळेवाडी (तुरेवाले) या मंडळाचे सादरीकरण जल्लोषात सादर झाले. बाप्पाची भक्ती गीते, राधा कृष्णाची गीते आणि भक्ती संगीताने भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते.

तुरेवाले शाहीर तुषार घुमे यांच्यासह सुरेश घुमे यांनी सुमधुर आवाजात गाणी गायली. ही गाणी राकेश डाफळे यांनी लिहिली होती. या गाण्यांना यतीन डाफळे यांनी ढोलकीने, तर संदीप डाफळे यांनी ऑर्गोनने संगीत दिले. सुनील घुमे, संजय डाफळे, नंदकुमार डाफळे, संतोष डाफळे आदींनी उत्तम साथ दिली. ग्रामीण भागातील कलाकारांच्या या सादरीकरणाने भक्तगणांचे समाधान झाले. सर्वांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्योजक गजानन साळवी यांच्या कुटुंबीयांनी येणाऱ्या सर्व भक्तांचे आदरतिथ्य करण्यात आले. एकूणच, बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण गाव मंगलमय झाले असून, हा कार्यक्रम पाहण्यासाठी खोडदे पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!