मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पाटपन्हाळे महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई याच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा संक्षेपात आढावा घेतला. अशा थोर महापुरुषाला आपण सर्वांनी अभिवादन करून त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते आचरणात आणावे म्हणजे खऱ्या अर्थाने या महापुरुषांना अभिवादन केले असे म्हणता येईल असे त्यांनी म्हटले. यावेळी ‌द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील अम्मार नेवरेकर यानेही आपले मनोगत व्यक्त करतांना म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा परिचय करून देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे चरित्राचे रोज एक तरी पानाचे वाचन करून त्यांचे विचार समजून घ्यावे असे म्हटले.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, श्री. परशुराम चव्हाण व महाविद्यालयीन वि‌द्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौम्या चौघुले यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!