मुख्य बातमी
“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत कोकण रेल्वेचे स्वच्छता अभियान

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत कोकण रेल्वेने पंधरा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वेचा मार्ग, स्थानके आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
यात कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्वच स्थानकात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्थानकांना जोडणारा मुख्य रस्ता, प्लॅटफॉर्म, रेल्वेमार्ग सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली. केंद्र सरकारच्या “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत कोकण रेल्वे पंधरा दिवस विविध उपक्रम राबवत आहे.



