मुख्य बातमी
मेर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्त मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर श्री. शेख यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. हा दिवस मुलांनी वाचन दिन म्हणून साजरा केला. तसेच शाहाजान भाटकर यांनी याप्रसंगी हात धुण्याचे महत्त्व विषद केले. यावेळी जागतिक हात धुणे दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सत्येश्री खर्डे, सौ. स्नेहल कुरतडकर, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.



