मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अंजणारी पुलावर अपघातांची मालिका सुरूच; गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक उलटला

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पूल येथे अपघातांची मालिका सुरूच असून, आज (२१ ऑक्टोबर) सकाळी गोव्याच्या दिशेने जाणारा एक ट्रक उलटला झाल्याची घटना घडली. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल परिसर अपघातप्रवण ठरत असून, येथे वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत. बुधवारी सकाळी गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक पलटी झाल्याने या परिसरातील अपघातांची समस्या पुन्हा चर्चेत आली आहे.

अंजनारी पूल परिसरात सातत्याने अपघात होत असतानाही ते रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असून, महामार्ग विभागाने या ठिकाणच्या अपघातांची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!