मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जिल्ह्याच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व डॉ. अनिल जोशी यांचे निधन

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले रत्नागिरी मध्यवर्ती बँकचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच गुहागर मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल जोशी यांचे शनिवारी रात्री निधन झाले.

डॉ. जोशी यांनी गेली अनेक वर्षे वैद्यकीय सेवेत कार्य करत असताना सहकार क्षेत्रातही मोलाची भूमिका निभावली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने गुहागर तालुक्यातील वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!