मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांनी स्वीकारला

रत्नागिरी : नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज (९ ऑक्टोबर) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्यचा अंक देवून त्यांचे स्वागत केले.



