मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

झोंबडी-काजळीवाडी (गुहागर) येथे हँडवॉशचे वाटप

आबलोली (संदेश कदम) : निर्मल ग्रामपंचायत झोंबडीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील झोंबडी-काजळीवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांना सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हॅन्डवॉशचे वाटप करण्यात आले.

यावेळी तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिम कुमार कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश मोहिते, आरोग्य निरीक्षक मदन जानवळकर, आरोग्य सेवक वैभव जाधव, विकास दुपटे, अजय हळये, विशाल चव्हाण, आरोग्य सेविका मोहिनी पानगले, अक्षता पाणकर, आशा सेविका मिनल घोणसे पाटील, पूजा कदम, उर्मिला बाईत, साक्षी सरदेसाई, उपकेंद्र मदतनीस ग्रीष्मा जाधव, वाडी अध्यक्ष सुरेश पालशेतकर, झोंबडी काजळीवाडी उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नितीन आंबोवकर, सचिव राकेश शिरकर, उत्कर्ष सेवा महिला मंडळ अध्यक्ष सुषमा पालशेतकर, झोंबडी ग्रामपंचायत अधिकारी गोरखनाथ सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक गायकवाड, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य जैनब ममतुले, मयुरी लांजेकर, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता शिरीष पापरकर आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच अतुल लांजेकर यांनी ग्रामस्थांना आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!