मुख्य बातमी

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे सँडविच मेकिंग कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ट्रॅव्हल टुरिझम फूड अँड हॉस्पिटॅलिटी या विभागातर्फे ‘सँडविच स्टेशन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये बेसिक ते प्रोफेशनल अशा सात सँडविच रेसिपी शिकवण्यात आल्या. ट्रॅव्हल टुरिझम फूड अँड हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षक प्रसाद शेवडे यांनी या रेसिपी आणि या प्रकारच्या व्यवसायासाठी गरजेच्या असलेल्या बाबी तसेच रेसिपीमधील बारकावे, भाग घेतलेल्या भगिनींना शिकवले आणि विद्यार्थिनींचा ही उत्तम प्रतिसाद लाभला. अशा प्रकारच्या सर्व फूड वर्कशॉपमध्ये आम्ही आवर्जून भाग घेऊ अशी हमी देत उपक्रमाची सांगता केली. श्री. स्वप्नील आणि श्रीमती साधना यांचे या उपक्रमाला मोलाचे योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!