मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वैश्य समाजाच्या उद्योजकतेचा भव्य सोहळा ‘यशोत्सव २०२६’ मुंबईत उत्साहात होणार

आबालोली (संदेश कदम) : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणारा भव्य ‘यशोत्सव २०२६’ हा सोहळा येत्या रविवारी (११ जानेवारी) राष्ट्रीय मिल मजदूर संघ (आरएमएमएस) हॉल, परळ, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात वैश्य समाजातील यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या सामाजिक योगदानाचाही सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी आतापर्यंत ७०० हून अधिक वैश्य समाजबांधवांनी नोंदणी केली असून, देश-विदेशातील नामांकित उद्योजकांची उपस्थिती लाभणार आहे.

‘यशोत्सव २०२६’ हा केवळ सन्मान सोहळा नसून, तो नेटवर्किंग, व्यवसायवृद्धी, रेफरल आणि नव्या व्यावसायिक संधींसाठी प्रभावी मंच ठरणार आहे. कार्यक्रमात उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे व आरती बनसोडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाडये, विष्णू सातवसे व मनोज आंग्रे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

याप्रसंगी उद्योगरत्न पुरस्कार गिरीश कोळवणकर, सौ. प्रियांका गांधी, सौ. रुषाली मोरये, राज साडविलकर, विनय पाताडे, विनायक धडाम तसेच उद्योगश्री पुरस्कार दयानंद माणगावकर, रामकृष्ण कोळवणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शालीग्राम खातू, संतोष भालेकर, भाई शेट्ये, तसेच नवनिर्वाचित वैश्य समाजातील सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील एकता, प्रगती आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांसाठी सातत्याने कार्यरत असून, ‘यशोत्सव २०२६’च्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

कार्यक्रमासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अजित लाड (९८३३०३७३३४) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!