जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूरसाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार असून, त्यांचा संपर्क क्रमांक (९९२०७८२५७१) असा आहे. तसेच मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागरसाठी पश्चिम उपनगरे बांद्रा (पू) अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) गणेश मिसाळ हे निरीक्षक म्हणून काम पाहणार असून, त्यांचा संपर्क क्रमांक (९७३०६७५००८) असा आहे.
नियुक्त केलेले निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



