मुख्य बातमी
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड ग्राऊंडवर

रत्नागिरी : भारताचा ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलीस परेड ग्राऊंड येथे उद्या (२६ जानेवारी) सकाळी ठीक ९.१५ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.



