मुलाकडून वडिलांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी : जागा विकून गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या वडिलांनाच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना झाडगाव येथे घडली आहे.
१८ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ओंकार राजेश पांचाळ (रा. सागर नीरज अपार्टमेंट, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश शंकर पांचाळ (वय ५०) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ओंकार याने वडिलांकडे त्यांच्या नावावरील शिरगाव येथील जागा विकून त्याला गाडी घेऊन देण्याची मागणी केली होती; मात्र वडिलांनी यास स्पष्ट नकार दिल्याने तो संतप्त झाला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने वडिलांना मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.



