शिवार आंबेरे पेजेवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळ यांच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. आज सकाळी सकाळी ७ वाजता अभिषेक झाल्यानंतर ११ च्या सुमारास भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारच्या सत्रात शालेय स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. यात रंगभरण स्पर्धेत मोठा गटात आयुषा दिलीप पेजे, अद्विता अनिल पोतदार आणि श्रद्धा जितेंद्र सुतार यांनी, तर लहान गटात साई संदीप शेलार, स्वरा निकेत बिजै, वेदिका विकास लाखण यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

वक्तृत्व स्पर्धेत अन्वी सुरेंद्र लिंगायत, सिया प्रमोद माईन, हर्षा राजेश गिजबिले यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. त्यानंतर भोवती, क्रिकेट स्पर्धा झाल्या. यावेळी व्यासपीठावर तरुण विकास मंडळ पेजेवाडी शिवार आंबेरे मुंबई अध्यक्ष अनंत बाळू पेजे, सचिव सूर्यकांत नारायण पेजे, खजिनदार भरत कृष्णा पेजे, ग्रामीण अध्यक्ष सुभाष तानू पेजे, सचिव अनंत यशवंत पेजे, खजिनदार सूरज नारायण पेजे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच जितेंद्र शिर्सेकर, अया सोनाली सुदेश नाटेकर उपस्थित होते. स्पर्धेला परीक्षक म्हणून दयानंद लाखण, गोपाळ रोकडे, दिवाकर तरळ यांनी काम पाहिले. कौस्तुभ धनावडे, सूर्यकांत पेजे, नंदकिशोर पेजे, अक्षय पेजे, भरत पेजे, दिलीप पेजे, समीर पेजे, शिवार आंबेरे पोलीस पाटील सुदेश नाटेकर यांचे विशेष साह्य लाभले.

यावेळी शिवार आंबेरेचे माजी सरपंच श्री. शिर्सेकर यांनी तरुण विकास मंडळाला ३८ वर्षे पूर्ण झाल्याचे नमूद करतानाच मंडळाने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुदेश नाटेकर यांनी केले. आभार अनंत पेजे यांनी मानले.



